१६७०मध्ये शिवछत्रपतींनी मोगलांच्या तावडीतून इतर दोन दुर्गांसोबत रवळ्या व जवळ्या घेतल्याचे उल्लेख काही इतिहासकारांनी नोंदविले आहेत....मोगलांचा सरदार दिलेरखानाने ही दर्ग जोडी परत घेण्यासाठी गडाला वेढा घातला होता...त्र्यंबकचे किल्लेदार मोरोपंत पेशव्यांनी हा वेढा उठविण्यासाठी १२००० सैनिक पाठविले होते...या सैन्यात रामची पांगेरा हा सुद्धा होता...दिलेरखानाच्या सैन्याला गडाच्या खालून व वरून असा दुहेरी सामना करावा लागत होता...शेवटी बेजार होऊन त्याने वेढा उठविला...